Breaking News

शिवाजीनगर क्रिकेट अकादमीत आरडीसीए प्रीमियर लीग

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)च्या वतीने पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथील शिवाजी नगर क्रिकेट अकादमीमध्ये आरडीसीए प्रीमियर लीग 2025 या क्रिकेट स्पर्धेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)चे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 12) या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हे क्रिकेट मैदान सर्वांसाठी खुले असल्याचे सांगितले तसेच या मैदानाच्या विकासासाठी आर्थिक मदत करण्यासाठी आपण नेहमीच तयार राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. क्रिकेट खेळाला चालना मिळावी आणि गावातील खेळाडूंमधील क्रीडा कौशल्य वाढावी यासाठी मलोकनेते रामशेठ ठाकूर नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्याच संकल्पनेतून शिवाजीनगर येथे क्रिकेट अकादमी सुरू आहे.
या वेळी एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी खेळाडूंशी संवाद साधला आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.
उद्घाटन समारंभास आमदार अनिकेत तटकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, शिवाजीनगर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, न्हावे ग्रामपंचायतीचे सदस्य सागर ठाकूर, भाजप पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, उलवे मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ, उपाध्यक्ष यशवंत साबळे, माजी नगरसेवक गणेश कडू, किशोर पाटील, निलेश खारकर, धीरज ओवळेकर, प्रदीप नाईक, प्रशांत ओक, राजेश पाटील, प्रदीप खलाटे, किरीट पाटील, मनोज लोखंडे, जयंत नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आरडीसीएच्या माध्यमातून शिवाजी नगर क्रिकेट अकादमीत 12 ते 25 मे या कालावधीत आरडीसीए प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला असून त्यात 16, 19 व 23 वर्षांखालील तसेच सिनियर गटातील खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेमुळे रायगड जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply