मुंबई : प्रतिनिधी
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे आमदार व माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. सध्या ते प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून काम करत होते. मुंबई येथे मंगळवारी (दि. 1) प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
मुंबईतील वरळी डोममध्ये झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष व सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह भाजपचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी
भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …
RamPrahar – The Panvel Daily Paper