खारघरमधील अभिनय प्रशिक्षण शिबिराला लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त मंगेश चितळे व नाट्य परिषद शाखा पनवेलचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबिर खारघर येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरास शनिवारी (दि.5) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली.
या वेळी त्यांच्यासमवेत जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष वाय.टी. देशमुख,तसेच पब्लिक स्कूलच्या समन्वयक श्रीमती चष्मिंदर बक्षी, पनवेल मनपाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पनवेलचे कार्यवाह श्यामनाथ पुंडे, सहकार्यवाह स्मिता गांधी, तसेच प्रशिक्षक अशोक केंद्रे, प्रा. रवी धुतडमल, संकेत खेडकर,शाळेच्या शिक्षिका उपस्थित होत्या.
श्री. ठाकूर यांनी या वेळी शिबिरार्थी मुला-मुलींसमवेत संवाद साधला. मुलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.तसेच त्यांनी शिबिरात होत असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली.शिबिराला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून रामशेठ ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शिबिराच्या पुढील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
महापालिका कार्यक्षेत्रात खारघर प्रभागात प्रथमत: अशा पध्दतीचे शिबिर आयोजित करण्यात आले असून, पालिका कार्यक्षेत्रात सांस्कृतिक चळवळ अधिक रूजण्यासाठी या शिबिराचा उपयोग होणार आहे. पनवेलमधील नाट्यकलावंतांना अभिनयाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण मिळावे याकरिता अशा प्रकारचे शिबिर घेणे आवश्यक आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन आखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेच्या सहकार्यातून हे अभिनय प्रशिक्षण आयोजित केले आहे.

Check Also

Пинко казино: Азартные игры или развлечение?

Пинко казино: Азартные игры или развлечение? Вопрос о том, является ли Пинко казино азартной игрой …

Leave a Reply