खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे मास्टरमाईंड स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सरकार समारंभ शनिवारी (दि.5) आयोजित करण्यात आला होता. या वेळी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, येथे मास्टर माइंड्स स्पर्धा 2024-25चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला, ज्यात विद्यार्थ्यांनी आपले उत्कृष्ट कौशल्य प्रदर्शन केले. या स्पर्धेत इंग्रजी, विज्ञान, गणित, भूगोल आणि सामान्य ज्ञान यांसारख्या विविध विषयांमध्ये शालेयस्तरावर तब्बल 900 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यापैकी सर्वच्या सर्व 900 विद्यार्थी ज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आणि त्यांनी ए प्लस आणि ए श्रेणी मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. राज्यस्तरीय मास्टरमाइंड्स
स्पर्धेत 213 विद्यार्थ्यांनी भाग घेतला, ज्यापैकी अनेकांनी ए प्लस आणि ए श्रेणी प्राप्त केली. विशेष म्हणजे, 45 विद्यार्थ्यांनी रँक होल्डर बनण्याचा मान मिळवला आणि त्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. याही पुढे जाऊन, 118 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर शाळेचे प्रतिनिधित्व केले, आणि त्यापैकी 22 विद्यार्थी रँक धारक ठरले. राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावणार्या विद्यार्थ्यांमध्ये सानवी संदीप सौकुर, स्वरा तेजस पोथी, अरिशा मन्सूरी, अभिराज शिलीमकरआणि गरवी तिडके या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सदस्य राहुल घरत आणि प्राचार्य राज अलोनी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper