Breaking News

मेरीची निखतवर लीलया मात

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पुढील वर्षी होणार्‍या ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी आयोजित महिलांच्या बॉक्सिंग चाचणीत भारताच्या मेरी कोमने निखत झरीनला पराभूत करत आपले स्थान पक्क केले आहे.
माजी ज्युनियर जागतिक विजेती निखत झरीन आणि सहा वेळा जगज्जेतेपद पटकाविणारी मेरी कोम ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी आयोजित महिलांच्या बॉक्सिंग चाचणीत शनिवारी (दि. 28) आमनेसामने आल्या होत्या. झरीनने राष्ट्रीय विजेत्या ज्योती गुलियाला पराभूत करून अंतिम फेरी गाठली, तर मेरी कोमने रितू ग्रेवालला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या वेळी मेरीने 9-1 अशा मोठ्या फरकाने सामना जिंकला, मात्र विजयानंतर मेरीने झरीनसोबत हात मिळवण्यास नकार दिला. यावर मेरीने, ’मला हात मिळवायची गरज काय आहे. जर ती दुसर्‍यांकडून सन्मानाची अपेक्षा करीत असेल, तर तिला दुसर्‍यांचाही मान ठेवता आला पाहिजे. मला अशी लोकं आवडत नाहीत, तुम्हाला काही सिद्ध करायचे असेल ते रिंगमध्ये करा रिंगच्या बाहेर नाही,’ असे उत्तर दिले आहे.
चीनमध्ये होणार्‍या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी संघ निवडताना माझी मेरी कोमशी चाचणी लढत खेळवावी, अशी मागणी निखतने केली होती. निखतने क्रीडामत्र्यांनांही पत्र लिहिले होते. त्यात मेरी चाचणीपासून दूर पळते आणि ऑलिम्पिक पात्रतेसाठी दोन हात करण्याची तिची तयारी नाही, असा आरोप 23 वर्षीय झरीनने केला होता. त्यानंतर मेरीने भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या ’सिलेक्शन पॉलिसी’शी आपण पालन करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply