पनवेल : रामप्रहर वृत्त
डॉक्टर्स डे आणि सीए डेचे औचित्य साधून पनवेलमधील सेवाव्रती, निष्णात डॉक्टर्स, तसेच समाजबांधिलकी जपणारे सीए-चार्टर्ड अकाउंटन्स, यांना भारत विकास परिषद, पनवेल शाखेच्या वतीने रविवारी ज्या वर्षीचा आरोग्यरत्न पुरस्कार आणि लेखारत्न पुरस्कार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यंदाचे हे या पुरस्काराचे दुसरे वर्षे आहे.
पुरस्कारामधे सीए एकनाथ पाटील आणि सीए अभय साखळकर यांना लेखारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला तर डॉ. भरतकुमार पलण, डॉ. घनश्याम वैष्णव, डॉ. रंजना, डॉ.मंगलसिंग राजपूत यांना आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, सीए मुकुंद चितळे आणि डॉ. अभिजीत सोनावणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भिक्षेकर्याचा डॉक्टर अशी आगळेवेगळी ओळख असणारे डॉ. अभिजित सोनावणे यांची मुलाखत या वेळी डॉक्टर समिधा गांधी यांनी घेतली. दरम्यान, कार्यक्रमात सुरूवातीला आषाढी एकादशीनिमित्त संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या आयुष्यावर आधारित गाऊ कथा तुकोबांची.. ह्या सतिश काळे लिखित आणि डॉक्टर सलिल लाटे दिग्दर्शित संगीतमय कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. त्यानंतर भारत विकास परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष सुबोध भिडे यांनी संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेतला.
खांदा कॉलनीमधील डॉ. पिल्लई ग्लोबल अकॅडमी स्कुल मध्ये झालेल्या या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भारत विकास परिषद, मुंबई-कोकण प्रांत अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी मोहन हिन्दुपुर, शेखर बर्वे, पद्मजा कुलकर्णी यांच्याश सीए, डॉक्टर्स आणि संस्थेचे सभासद असे एकूण 250 मान्यवर उपस्थित होते.
Check Also
गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …
RamPrahar – The Panvel Daily Paper