पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने रविवारी (दि. 21) सकाळी 6 वाजता पनवेलमधील वडाळे तलाव येथे नमो युवा रनचे आयोजन करण्यात आले आहे.
’स्वस्थ आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी’ या शीर्षकाखाली होणार्या या रनचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते होणार आहे.
या वेळी माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अॅड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारुशीला घरत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पनवेल दक्षिण मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ, उरण शहर अध्यक्ष प्रसाद भोईर, उरण ग्रामीण अध्यक्ष धनेश गावंड, खालापूर पश्चिम अध्यक्ष प्रवीण मोरे, खालापूर पूर्व अध्यक्ष सनी यादव, कर्जत शहर अध्यक्ष राजेश लाड, कर्जत ग्रामीण अध्यक्ष दिनेश रसाळ, नेरळ मंडळ अध्यक्ष नरेश मसणे आदी उपस्थित राहणार आहेत.
Check Also
उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!
पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …
RamPrahar – The Panvel Daily Paper