पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल सेक्टर 19 येथील ग्रीनबेल्ट गार्डनमध्ये बसवण्यात आलेल्या ओपन जिम आणि लहान मुलांसाठी खेळण्याच्या साहित्याचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.25) झाले. या वेळी त्यांनी नवीन पनवेल परिसरात येणार्या काळात चांगल्या पद्धतीचा विकास होईल, असे प्रतिपादन केले तसेच भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागल्याबद्दल कौतुक केले.
पनवेल मतदारसंघाचे क्रियाशील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिका क्षेत्रात अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. यालाच अनुसरून माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे नवीन पनवेल मंडळ उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी पनवेल महापालिकेकडे नवीन पनवेल सेक्टर 19 येथील ग्रीनबेल्ट गार्डनमध्ये ओपन जिम आणि लहान मुलांसाठी खेळणी बसवण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून हे साहित्य महापालिकेच्या माध्यमातून गार्डनमध्ये बसवण्यात आले आहे.
उद्घाटन समारंभास भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, उपाध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेविका सुशीला घरत, वृषाली वाघमारे, हरचंदसिंग सग्गू, मयुर कदम आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper