Breaking News

सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य शिबिर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा समर्पण पंधरवडा साजरा करण्यात आला. या अंतर्गत खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात शनिवारी (दि. 4) मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले, ज्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या शिबिरास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर सीता पाटील, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे, गणेश पाटील, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, भाजप नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, भीमराव पोवार, गोपीनाथ मुंडे, मोतीलाल कोळी, युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या शिबिराच्या माध्यमातून आरोग्यविषयक बाबींची तपासणी व मार्गदर्शन लाभले.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply