Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वसतिगृह इमारतीचे कोनशिला अनावरण

पुढील टप्प्यासाठी आणखी 25 लाखांच्या निधीची घोषणा

सातारा ः प्रतिनिधी
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने सामाजिक व शैक्षणिक बांधिलकीतून लोकस्मृती वसतिगृह योजना हाती घेतली असून या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील इमारतीचे दर्जेदार बांधकाम पूर्ण झाले आहे. या वसतिगृहाच्या पुढील टप्प्यासाठी आणखी 25 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, विद्यापीठाचे माजी विद्यार्थी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 4) केली.
शिवाजी विद्यापीठाच्या लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहाच्या इमारतीचे ऑनलाईन पद्धतीने कोनशिला अनावरण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सातारा येथे झाले. या वेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, लोकस्मृती वसतिगृहाच्या बांधकामाची ध्वनीचित्रफीत पाहिल्यावर या कामाचा दर्जा आणि विद्यापीठाची विद्यार्थिनींप्रती असलेली उदात्त भावना स्पष्ट जाणवते. विद्यार्थिनींसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरेल. पुढील टप्प्याचे कामही समाजातील दातृत्वातून सहज मार्गी लागेल.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यापूर्वीही या वसतिगृहासाठी 25 लाखांचा निधी दिला होता, ज्याचा विनियोग विद्यापीठाने यशस्वीरित्या केला. या वेळी विविध देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त अधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. अजित कोळेकर, ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. वैशाली सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply