गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत कोर्सची सुविधा

सातारा ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्था आणि मराठा बिझनेस फोरम शिवनेरी अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन कोर्सला सुरुवात करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना फी भरून कोचिंग घेणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठे वरदान ठरणार आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाला यासाठी निधी देणारे ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मोठा अधिकारी व्हायचे असेल तर यूपीएससी व एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते. गरीब घरातील मुलगा किंवा मुलगीसुद्धा या परीक्षेत उत्तीर्ण होऊन मोठा अधिकारी बनू शकतो हे अनेकांनी सिद्ध केले आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा येथे सुरू करण्यात आलेल्या या मोफत मार्गदर्शन केंद्रात मजूर वर्गातील विद्यार्थ्यांची मुले शिकत आहेत.
अनुभवी मार्गदर्शकांकडून सखोल व दर्जेदार मार्गदर्शन या कोर्समध्ये दिले जाणार असून यूपीएससी व एमपीएससी परीक्षांसाठी आवश्यक विषय, अभ्यास पद्धती, वेळ व्यवस्थापन आणि मुलाखत तयारी यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले, मी स्वतः सातारच्या रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमध्ये 1968 ते 1972 या काळात चार वर्षे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे या कॉलेजबद्दल माझ्या मनात विशेष आदर आणि प्रेम आहे. या कॉलेजमधून तुम्हाला अशा प्रकारचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे याचा मला अभिमान आहे. गेल्या वर्षी मी या कॉलेजला अर्थसहाय्य केले होते आणि यंदाही मी आर्थिक मदत करणार आहे.
जीवनात यश-अपयश येतं असतं, पण आपण आपल्या डोळ्यासमोर एक ठाम ध्येय ठेवून त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, तर यश नक्कीच मिळते, असेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभास छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र मोरे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, अरुण पवार, दिलीप देशमुख, किरण पाटील, मनोज देशमुख, वैभव सणस, रोशन पाटील, राजेंद्र साबळे, अमोल अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply