Breaking News

शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून नवागतांचे स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कळंबोलीत शेतकरी कामगार पक्षाला धक्का बसला असून अनेक तरुण, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष नेते जे.एम. म्हात्रे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी झाला.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक बबन मुकादम, राजू शर्मा, माजी नगरसेविका मोनिका महानवर, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर, महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम, माजी नगरसेविका सुरेखा मोहोकर, अमर ठाकूर, अशोक मोटे, रामा महानवर, सुरेश भोईर, सरस्वती काथारा आदी उपस्थित होते.
या वेळी कळंबोली शहर आणि गावातील शेकापच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. यामध्ये ज्ञानेश्वर घाडगे, निलेश भगत, राजा साळुंखे, अजित जाधव, संदीप पाटील, चंद्रकांत पाटील, भारती वाघ, शोभा पडळकर, सुमती पाटील यांचा समावेश होता. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान …

Leave a Reply