पनवेल : रामप्रहर वृत्त
दैनिक रामप्रहरने दिवाळी अंकाची उज्ज्वल परंपरा कायम राखत यंदा सर्व प्रकारचे वैचारिक साहित्य वाचकांसाठी उपलब्ध केले आहे. ‘मुक्तछंद’ शीर्षक असलेला हा अंक सर्वस्पर्शी असून डिजिटल स्वरूपातही साकारल्याचे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 17) प्रकाशनावेळी काढले.
या कार्यक्रमास ‘रामप्रहर’चे मुख्य संपादक देवदास मटाले, व्यवस्थापक दादाराम मिसाळ, वृत्तसंपादक समाधान पाटील, उपसंपादक तन्वी गायकवाड-पवार, नितीन देशमुख, मुख्य आर्टिस्ट अरुण चवरकर, शशिकांत बारसिंग, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे, संजय कदम, मल्हार चॅनेलचे संपादक नितीन कोळी, गणेश धुमाळ, अविनाश डोयरिया आदी उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या कथा, कविता, लेख, व्यंगचित्र अशा सर्व साहित्याने सजलेल्या सर्वांगसुंदर दिवाळी अंकाचे कौतुक केले आणि सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper