पनवेल : रामप्रहर वृत्त
नागरिकांची सेवा करून त्यांच्या समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून काम करा. यातून पक्षाची ताकद आणखी वाढेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 20) येथे केले. ते पनवेल तालुक्यातील पाली येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात बोलत होते.
भाजपच्या माध्यमातून होत असलेला विकास तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते ‘कमळ’ हाती घेत आहेत. यालाच अनुसरून वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायत हद्दीतील पाली गावचे शिवसेना उबाठा पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य चिंतामणी शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पनवेल मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उपस्थित अन्य मान्यवरांनी प्रवेशकर्त्यांचे भाजपची शाल देऊन स्वागत केले.
कार्यक्रमास भाजप राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, तालुका चिटणीस यतिन देशमुख, सतीश शेळके, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवळे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी शिवसेना ‘उबाठा’चे चिंतामणी शेळके, नयना शेळके, हरेश शेळके, स्वाती शेळके, महेश शेळके, चित्रा शेळके, सुभाष शेळके, भरत भोईर, रेखा भोईर, बारक्या शेळके, हनुमान शेळके, नितीन शेळके, भगवान शेळके, मच्छिंद्र शेळके, शाम शेळके, राम शेळके, जान्हवी शेळके, अजय शेळके, गुलाब शेळके, वैशाली शेळके, स्वस्तिका शेळके, वैजंती शेळके, हरेश शेळके, संतोष शेळके, प्रशांत भोईर, बारकी शेळके, कुणाल शेळके, इंद्राबाई शेळके, निलम भोईर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरवू, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
Check Also
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन
विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …
RamPrahar – The Panvel Daily Paper