Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते खारघरमध्ये इनोव्हेशन गॅलरीचे उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या खारघर येथील रयत सेन्टेनरी इनोव्हेशन अँड इंक्युबेशन फाउंडेशन येथील इनोव्हेशन गॅलरीचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि.28) केले. या इनोवेशन गॅलरीमध्ये नव उद्योजकांनी अविष्कार केलेल्या प्रॉडक्ट व सर्विसेस प्रदर्शित केल्या जातील.
रयत शिक्षण संस्थेचा उपक्रम असलेल्या RCIIF या ठिकाणी विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या संशोधन आणि कौशल्य विकासाला चालना दिली जाते आणि त्यांना उद्योजक होण्यामध्ये मदत केली जाते.
रयत सेन्टेनरी इनोव्हेशन अँड इंक्युबेशन फाउंडेशनने मार्गदर्शन केलेल्या कागपत्र नावाच्या स्टार्टअप च्या नवउद्योजक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. नवउद्योजकांनी झी टीव्हीवरील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आयडियाबाज या स्टार्टअपवर आधारित रियालिटी शोमध्ये सहभाग घेतला. तसेच रामशेठ ठाकूर साहेबांनी युनूस सय्यद यांच्या भारत टेली क्लिनिक या ग्रामीण भागासाठी तयार केलेल्या वैद्यकीय प्रॉडक्ट आणि सर्विसेस बद्दल त्यांचे कौतुक केले.
या निमित्ताने रामशेठ ठाकूर साहेबांनी रयत सेन्टेनरी इनोव्हेशन अँड इंक्युबेशन फाउंडेशनच्या कामकाजाचा आढावा घेतला व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. इनोव्हेशनवर आधारित स्टार्टअपची भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी अत्यंत गरज असून त्यावर नव उद्योजकांनी भर द्यावा, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित असणार्‍या नव उद्योजकांना केले.
या वेळी त्यांनी रयत सेन्टेनरी इनोव्हेशन अँड इंक्युबेशन फाउंडेशन येथील स्टार्टअपच्या प्रॉडक्ट व सर्विसेस प्रदर्शनास भेट दिली.
या वेळी रयत शिक्षण संस्थेचे सचिव माननीय विकास देशमुख, डॉ. रवींद्र घोडविंदे, आरसीआयआयएफचे संचालक परेश पारेख, डॉ. शुभदा नायक आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीईओ दिनेश इसरानी, सीओओ देववृत जाधव व इतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply