पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आकुर्ली ग्रामपंचायतीसह परिसरात 75 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 31) करण्यात आला. भाजप राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन झाले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळत आहे. त्यानुसार त्यांच्या 20 लाख रुपयांच्या जिल्हा परिषद सेस फंडातून आकुर्ली येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, 20 लाख रुपयांच्या आमदार निधीमधून आकुर्ली ग्रामपंचायतीमधील अपेक्षा कॉम्प्लेक्सपासून चिमाजी गायकवाड यांच्या घरापर्यंत गटार व रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयांच्या जिल्हा नियोजन निधीमधून आकुर्लीमध्ये अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, 15 लाख रुपयांच्या जिल्हा नियोजन निधीमधून आकुर्ली नदीला संरक्षण भिंत बांधणे तसेच 10 लाख रुपयांच्या आमदार निधीमधून आकुर्ली ग्रामपंचायत येथे साकव बांधण्यात येणार आहे. या कामांचा शुभारंभ भाजप राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमास भाजप नेते संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष अमित जाधव, भाजप पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, तालुका चिटणीस यतीन पाटील, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, सरपंच सचिन पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या विकासकामांमुळे आकुर्ली परिसरातील नागरिकांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ होणार आहे.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper