Breaking News

कर्नाळा बँकेतील ठेवींबाबत सहकार विभाग पुढाकार घेणार

जप्त मालमत्ता, कायदेशीर प्रकरणांबाबत मुख्यमंत्र्यांकडे होणार बैठक

मुंबई : प्रतिनिधी
कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यासाठी सहकार विभागाने पुढाकार घ्यावा. या बँकेच्या जप्त मालमत्ता, कायदेशीर प्रकरणे या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याकडे बैठकीचे आयोजन केले जाईल, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीनुसार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीच्या वेळी आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, सह सचिव संतोष पाटील आदी उपस्थित होते.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले, बँकेच्या ठेवीदारांना ठेवी परत देण्यासाठी बँकेच्या ज्या मालमत्तासंदर्भात न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत यासंदर्भातदेखील सहकार विभागाने आवश्यक तो पाठपुरावा करावा.
एमपीआयडी यांच्याकडील विषयासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात यावा, असेही ते म्हणाले.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply