पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष महायुतीतर्फे उरण नगर परिषदेच्या निवडणुकीकरिता नगराध्यक्षपदाचे तसेच नगरसेवकपदाचे उमेदवार गुरुवारी, 13 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता आपले नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करणार आहेत.
या नामांकन दाखल सोहळ्यास रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तसेच उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पक्ष अध्यक्ष अविनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून महायुतीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
राहणार आहेत.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper