भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीतील तोंडरे गावात आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि गटारांचे काम सुमारे 16 कोटी रुपयांच्या निधीमधून करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि.12) झाले.
पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामे मार्गी लागत आहे. त्यानुसार 16 कोटी 28 लाख 99 हजार 751 रुपयांच्या निधीमधून तोंडरे गावातील पाण्याच्या टाकीपासून ते हनुमान मंदिर पर्यंत पावसाळी गटार बांधकाम आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या वेळी भाजप नेते राम पाटील, नारायण शेट पाटील, एकनाथ देशेकर, भाजपचे पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, महेश पाटील, वासुदेव पाटील , अशोक पाटील, विनोद पाटील, संतोष भोईर, अशोक साळुंखे, अंकुश पाटील, कैलास मढवी, परेश पाटील, नितेश पाटील, युवा मोर्च्या तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, बच्चू काठे, माणिक काठे, अरुण पाटील, धनाजी पाटील, वतन पाटील, नितीन पाटील, अनमोल पाटील, वसंत पाटील, बळीराम पाटील, सुभाष पाटील, रोहिदास पाटील, लक्ष्मण पाटील, दत्ता बुवा पाटील, शिवराम पाटील, आत्माराम पाटील, बामा पाटील, सुभाष पाटील, वसंत पाटील, आशीर्वाद पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper