
रेवदंडा : प्रतिनिधी
चौल ज्येष्ठ नागरिक संघाचा चतुर्थ वर्धापनदिन चौलनाका येथील सभागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महायुतीचे नवनिर्वाचीत आमदार महेंद्र दळवी यांच्या सत्कार करण्यात आला. हा सत्कार म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी दिलेला आशीवार्द असल्याचे सांगून आमदार दळवी यांनी ज्येष्ठ नागरिकासाठी चांगले काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्वांससर यांच्या हस्ते करण्यात आले. रेवदंडा पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुनिल जैतापुरकर यांनी या वेळी मार्गदर्शन केले. तत्पुर्वी संघाचे दिवंगत सभासद कै. आनंद मयेकर यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. चौल ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष शंकर पाटील, नागाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अनंतराव जोशी, चौल तुलाडदेवी ज्येष्ठ नागरिक संघाचे जगदीश म्हात्रे, शिवसेनेचे अशोक नाईक, ओमकार तांबडकर, हर्षल घरत, रमेश गोंधळी यांच्यासह संघाचे पदाधिकारी व सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघाचे सेेके्रटरी देवानंद पोवळे यांनी आभार मानले.