Breaking News

पनवेलमध्ये शनिवारी साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कविसंमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल व पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 15) पनवेलमध्ये साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या सोहळ्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर, सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख आदी उपस्थित राहणार आहेत.
पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी 4 वाजता सोहळा होणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 75व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा तसेच साहित्यिकांचा सत्कार या वेळी केला जाणार आहे, तर कविसंमेलनात सहभागी कवींना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह दिले जाईल.
या सोहळ्यास रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, पनवेल शाखेचे अध्यक्ष सुभाष कुडके यांनी केले आहे.

Check Also

मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण स्थापन करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील झपाट्याने …

Leave a Reply