पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल व पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 15) पनवेलमध्ये साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या सोहळ्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर, सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख आदी उपस्थित राहणार आहेत.
पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी 4 वाजता सोहळा होणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 75व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा तसेच साहित्यिकांचा सत्कार या वेळी केला जाणार आहे, तर कविसंमेलनात सहभागी कवींना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह दिले जाईल.
या सोहळ्यास रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, पनवेल शाखेचे अध्यक्ष सुभाष कुडके यांनी केले आहे.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper