Breaking News

तळोजात माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्यानाचे भूमिपूजन

तळोजा : रामप्रहर वृत्त
तळोजा परिसरात मोठ्या प्रमाणात आता शहरीकरण होत आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या माध्यमातून अनेक सुविधा येथील नागरिकांना उपलब्ध करून नागरिकांचे जीवनमान उंचवण्याचे काम होत आहे, असे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तळोजा येथे उद्यानाच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केले.
पनवेल महापालिका हद्दीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्यात येत आहेत तसेच जनतेला विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यानुसार भाजपचे पनवेल उत्तर तालुका मंडळ उपाध्यक्ष निर्दोेष केणी यांच्या प्रयत्नांमुळे तळोजा फेज 1, सेक्टर 15 येथील प्लॉट नंबर 6वर नव्याने उद्यान विकसित करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सहा कोटी 93 लाख 98 हजार 366 रुपयांच्या निधीतून साकारण्यात येणार्‍या या उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 13) झाले.
या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, उपाध्यक्ष निर्दोष केणी, प्रभाकर जोशी, तालुका उत्तर मंडळ सरचिटणीस विनोद घरत, आशा बोरसे, मन्सूर पटेल, सजित पटेल, सचिन म्हात्रे, जगदीश घरत, प्रभाग क्रमांक 3चे अध्यक्ष जगदीश घरत, रियाज शेख, संतोष घरत, युवा मोर्चाचे अध्यक्ष आशिष कडू यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन
पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19मधील कापड बाजारातील त्रिमूर्ती हॉटेलसमोरील गल्लीमध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 14) झाले. या वेळी माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, भाजप प्रभाग 19चे अध्यक्ष पवन सोनी, घनश्याम मानकामे, भगवती मेहता, अभिजित जाधव, तुषार कापरे, मंदार देसाई, चितुलला मेहता, भूषण चोणकर आदी उपस्थित होते.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply