पनवेल : रामप्रहर वृत्त
कामोठे परिसरात नागरीकरण वेगाने होत असल्याने ते विकासात्मक असावे या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष काम करीत असून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कामोठे येथे सिग्नलच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले.
पनवेल महापालिका हद्दीतील कामोठ्यामध्ये भाजपच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. विस्टा कॉर्नर येथे उभारण्यात आलेल्या या सिग्नलचे लोकार्पण माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 23) करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे कामोठे शहराध्यक्ष विकास घरत, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, दिलीप पाटील, गोपीनाथ भगत, डॉ. अरुणकुमार भगत, माजी नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, हेमलता गोवारी, कुसुम म्हात्रे, रवींद्र जोशी, भाजपच्या जिल्हा चिटणीस विद्या तामखडे, सामाजिक कार्यकर्ते आर.जी. म्हात्रे, रवी गोवारी, भाऊ भगत, प्रदीप भगत, राजेश गायकर, संतोष म्हात्रे, सुरेश खरात, प्रकाश पाटील, शुभांगी खरात, युवा नेते हॅप्पी सिंग, सोशल मीडिया सेलचे जिल्हा संयोजक सुशील शर्मा, कामोठे शहर सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, चिटणीस दामोदर चव्हाण, विनोद खेडकर, जयकुमार डिगोळे, कामोठे शहर शिक्षक सेल संयोजक मनोहर शिंगाडे, युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, सरचिटणीस प्रवीण कोरडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष विकी टेकवडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
Check Also
नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …
RamPrahar – The Panvel Daily Paper