Breaking News

खालापुरात घर तिथे लसीकरण! तहसील कार्यालयाची मोहीम

खालापूर : प्रतिनिधी

तहसील कार्यालय खालापुर येथे मंंगळवार (दि. 18) VACCINE ON WHEEL या मोहीमेचा शुभारंभ कर्जत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे व खालापुरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहीमे अंतर्गत प्रथमच गावोगावी, वाड्यावस्त्यांवर प्रत्यक्ष नागरिकांना संपर्क साधून त्यांचे कोविड 19 लसीकरण करण्यात येणार आहे. वृध्द, दिव्यांग तसेच दुर्धर आजारामुळे लसीकरण केंद्रावर जाऊ न शकणारे नागरिकांनादेखील याचा लाभ होणार आहे. सदरची मोहीम राबविण्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका VACCINE ON WHEEL या संस्थेव्दारे पुरविण्यात आलेली असून सदर रुग्णवाहिकेसोबत मोहीमेचे समन्वयक अमित पवार व एक डॉक्टर, दोन आरोग्य सहाय्यक, एक आशा सेविका यांचे पथक कार्यरत असणार आहे. जिल्हा परिषद रायगड व VACCINE ON WHEEL थकएएङ संस्था यांनी या बाबत सामजस्य करार केला आहे. सदर मोहीमेसाठी लागणारा सर्व निधी CIPLA FOUNDATION यांच्यामार्फत पुरविला जाणार आहे. या संस्थेव्दारे आजतगायत पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागात सात हजार लोकांचे लसीकरण पुर्ण करण्यात आले असून रायगड जिल्ह्यातील अन्य तालुक्यात टप्प्याटप्प्याने VACCINE ON WHEEL या मोहीमेअंतर्गत लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सदर मोहीमेची अंमलबजावणी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय साधून शासन निकषानुसार करण्यात येणार आहे. या मोहीमेच्या शुभारंभाला खालापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद रोकडे, राजश्री जोगी, नायब तहसीलदार रश्मी चव्हाण, नगरपंचायत मुख्याधिकारी  अनुप नागरे, सिप्ला फाऊंडेशनच्या उल्का धुरी, विनायक काळे, सुनिल मकरे उपस्थित होते. या मोहीमेचा खालापूर तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply