पनवेल : रामप्रहर वृत्त
खांदा कॉलनी परिसरातील महिलांसाठी रविवारी खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून साकारलेला हा सोहळा बेलेजा बँक्वेट हॉलमध्ये अत्यंत दिमाखात पार पडला.
या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. आपल्या भाषणात आमदार ठाकूर यांनी महिला सबलीकरणावर भर देत सांगितले की, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सामर्थ्यवान बनवण्यासाठी मोठ्या ताकदीने काम करत असल्याचे सांगून कोणत्याही समस्या असल्यास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सदैव नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, अशी ग्वाही दिली.
या सोहळ्याचे आकर्षण ठरली ती ममहाराष्ट्राची हास्यजत्राफ फेम अभिनेत्री शिवाली परब. शिवालीच्या उपस्थितीने महिला वर्गात मोठा उत्साह दिसून आला. तिने केवळ महिलांशी संवादच साधला नाही, तर चक्क संगीताच्या तालावर महिलांसोबत डान्स करत या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. खेळ पैठणीच्या या कार्यक्रमात पैठणी जिंकण्यासाठी महिलांमध्ये चुरस पाहायला मिळाली. विविध खेळांचे सादरीकरण आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याला भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेविका कुसुम पाटील, चंद्रकला शेळके, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, सदानंद पाटील, गोपीनाथ मुंडे, मोतीराम कोळी, संजय कांबळे, आशा मुंडे, प्रज्योती म्हात्रे, नितीन विचारे, अंकुश खरमाटे, रामनाथ पाटील, सचिन गायकवाड, शांताराम महाडीक, भूषण गायकवाड, संदेश भोपी आदी उपस्थित होते.
Check Also
गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …
RamPrahar – The Panvel Daily Paper