पोलादपूर, श्रीवर्धन : प्रतिनिधी, बातमीदार
महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांच्याप्रती आक्षेपार्ह व सत्यता सिध्द न झालेला व्हिडिओ शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर पोलादपूर तालुका शिवसेना आणि युवासेनातर्फे जाहीर निषेध नोंदविला. दरम्यान, श्रीवर्धन शहरातील शिवाजी महाराज चौकामध्ये शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी एकत्र येत शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या बॅनर वरील चित्राला जोड्यांनी मारले.
या वेळी संतप्त शिवसैनिकांनी चित्रलेखा पाटील यांच्या विधानाचा आणि व्हिडिओ व्हायरल करण्याच्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला. चित्रलेखा पाटील यांच्या व्हिडिओ व्हायरल करण्याच्या कृतीचा निषेध नोंदविताना जिल्हा सहसंपर्कप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, उपतालुकाप्रमुख शौकत तारलेकर, शहरप्रमुख सुरेश पवार, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, नगराध्यक्षा स्नेहा मेहता, युवासेना संपर्कप्रमुख विजय शेलार, विक्रम भिलारे, नगरसेवक विनायक दीक्षित, नागेश पवार, राजेश डांगे, दत्ता मोरे, सुनील तळेकर, अनिल दळवी, प्रसाद मोरे, प्रसाद पवार, गणेश येरूणकर, विभाग संघटिका गीता दळवी, उद्योजक रामदास कळंबे यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना पदाधिकार्यांनी शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओबाबत तत्काळ कारवाई करण्याची मागणी या वेळी केली. शिवसेना नेते भरत गोगावले यांच्या बद्दल बदनामीकारक व्हिडिओ प्रसिद्ध केल्याबद्दल श्रीवर्धन मध्ये शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे महिला आघाडीचे कार्यकर्ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.
Check Also
Как использовать аналитические функции на 1xbet зеркало
Как использовать аналитические функции на 1xbet зеркало Аналитические функции на платформе 1xbet зеркало предоставляют пользователям …
RamPrahar – The Panvel Daily Paper