पनवेल ः रामप्रहर वृत्त
लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने रविवारी (दि. 4) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिबिरास भेट देत रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
लोकनेते दि.बा. पाटील 27 गाव संघर्ष समिती आणि रुधीरसेतू सेवा संस्थेच्या सहकार्याने पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात हे शिबिर झाले. या उपक्रमात मोठ्या संख्येने तरुणांसह नागरिकांनी सहभाग नोंदवला. या वेळी उपस्थितांनी लोकनेते दि.बा. पाटील यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली.
शिबिरास नगरसेविका दर्शना भोईर, पनवेल-उरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल पाटील, सचिव बी.पी. म्हात्रे, कोषाध्यक्ष विजय गायकर, राजेश गायकर, मनीषा पाटील, प्रा. आकाश पाटील, प्रा. अलोक भानुशाली, सपना पाटील, डॉ. नरेंद्रकुमार दसरे, उन्मेश लोहार, योगेश जोशी, कविता ठाकूर, कविता पाटील, सुवर्णा मार्गे आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पनवेल-मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper