Breaking News

गुळसुंदे परिसरात विकासकामांचा धडाका

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन

रसायनी : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या निधीतून तसेच माध्यमातून गुळसुंदे ग्रामपंचायत परिसरात विविध विकासाची कामे करण्यात आली आहेत. या कामांचे लोकार्पण आणि नव्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 4) झाले.
गुळसुंदे येथे दशक्रिया विधी परिसर सुशोभिकरण करणे, गजानन महाराज मंदिर सभामंडप बांधणे, राजवाडा नगर येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण, पलाटवाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण आणि चिंचेचीवाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे अशी कामे पूर्णत्वास आली आहेत. या सर्व कामांचे लोकार्पण आणि आकुलवाडी येथे साकव बांधणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे या वेळी आदिवासी विकास अंतर्गत न्यूक्लिअस बजेट अंतर्गत मच्छीमार होड्या व जाळे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमांना भाजप पनवेल दक्षिण मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी जि.प. सदस्य राजू पाटील, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, तालुका उपाध्यक्ष प्रवीण खंडागळे, वावेघर पंचायत समिती अध्यक्ष प्रतिक भोईर, पळस्पे विभागीय अध्यक्ष सुनील गवंडी, राम गाताडे, महादेव कांबळे, संदीप पाटील, चंद्रकांत भोईर, आर.डी. पाटील, शांताराम मालुसरे, मनोज पवार, प्रमोद विद्वांस, मिनेश गाडगीळ, सुरेश जोशी, महादेव कावडे, बजरंग भागवत, विनायक भोईर, रमेश मालुसरे, जितेंद्र गाताडे, अजिंक्य सुर्वे, संतोष चौलकर, सतीश साठे, स्वप्नील चौलकर, जितेंद्र पाटील, मिनाक्षी जगताप-पाटील, अर्पणा चौलकर, काव्या जोशी, रूपेश चव्हाण, प्रशांत पाटील, अनिल सावंत, यशवंत जाधव, दीपक पारंगे, हर्षल जोशी, प्रथमेश पाटील, राजेश साठे, सुनील पालकर, चिंतामण गायकवाड, अंकित मालुसरे, बाळाजी गरूडे यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकासकामांबद्दल आमदार महेश बालदी यांचे आभार मानण्यात आले.

Check Also

परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …

Leave a Reply