Breaking News

महायुतीच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांच्या बैठका

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका निवडणुकीत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते सुरेश गोपी यांच्या उपस्थितीत खारघर, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेल येथे प्रभाग क्रमांक 4 ते 16मधील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 8) बैठका झाल्या.
या बैठकांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, रमेश नायर आदी उपस्थित होते.
नवीन पनवेलसह कामोठे, कळंबोली आणि खारघर परिसरात मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी या बांधवांशी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधला. केंद्र सरकारने ज्या पद्धतीने विकासाची गंगा घराघरात पोहचवली आहे, त्याचप्रमाणे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांची गती कायम ठेवण्यासाठी पनवेलमध्ये महायुतीची सत्ता असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री गोपी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा सादर केला. विशेषतः उज्ज्वला योजना आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील प्रगतीमुळे सर्वसामान्य महिलांचे जीवन कसे सुसह्य झाले आहे यावर त्यांनी भर दिला. पनवेलचा विकास हा केवळ स्थानिक प्रश्न नसून तो विकसित भारताच्या स्वप्नाचा एक भाग आहे, असेही ते म्हणाले.
या विविध बैठकांवेळी भाजपच्या माजी जिल्हा सचिव संध्या शरबिद्रे, यमुना प्रकाशन, खारघर महिला मोर्चा अध्यक्ष साधना पवार, मधुमिता जेना, गायत्री दुबे, गायत्री महापात्रा, प्रिया दळवी, रेखा सिंग, निर्मला यादव, सक्ेहल बोडाई, निलम विशपुते, योगिंद्र कोट्टारे, भाजप दक्षिण सेल अध्यक्ष खारघर नवीन हेगडे, तामिळ सेलचे प्रभारी एन.एस. मुरूगन, मनोहर नक्का, रामा कृष्णन, जयप्रकाश, श्यामला सुरेश शेट्टीगर, अ‍ॅड. सविना बंगेरा, मारी कुमार, शशिधरन नायर, टी.व्ही. टायहोमस, रॉय वर्गीस, लीना प्रेमानंद, श्री. राजय्या, सरस्वती गणेश, मंजू विनोद, श्रीनिवास संपत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याचबरोबर महायुतीचे प्रभाग क्रमांक 4मधील उमेदवार प्रवीण पाटील, परेशा पटेल, अनिता पाटील, मधू पाटील; प्रभाग 5चे उमेदवार शत्रुघ्न काकडे, मिनल पाटील, हर्षदा उपाध्याय, प्रवीण बेरा; प्रभाग 6चे उमेदवार उषा अडसुळे, नरेश ठाकूर, सोनल नवघरे, समीर कदम; प्रभाग 7चे उमेदवार अमर पाटील, मनाली ठाकूर, प्रमिला पाटील, राजेंद्रकुमार शर्मा; प्रभाग 8चे उमेदवार बबन मुकादम, रामदास शेवाळे, बायजा बारगजे, सायली सरक; प्रभाग 11 उमेदवार निलम मोहिते, प्रदीप भगत, चरणदीप सिंग; प्रभाग 12चे प्रभाकर कांबळे, विद्या तामखेडे, कुसूम म्हात्रे, दिलीप पाटील; प्रभाग 13 रवींद्र जोशी, विकास घरत, हेमलता गोवारी, शिला भगत आणि प्रभाग क्रमांक 16मधील संतोष शेट्टी, समीर ठाकूर, राजेश्री वावेकर, कविता चौतमोल हे उमेदवार हजर उपस्थित होते. मंत्री गोपी यांच्या उपस्थितीमुळे उत्साह पहायला मिळाला.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply