पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं महायुतीने प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (दि. 12) दुपारी 3 वाजता कळंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संवाद साधत व्हिजन मांडणार आहेत. पनवेल मनपा मैदान, भूमी गार्डेनियासमोर, सेक्टर 19, प्लॉट सी/2 कळंबोली या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपचे सहा अधिकृत उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. इतर ठिकाणीही महायुतीला मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस कळंबोलीत येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे. या कार्यक्रमाचे निवेदन सिने अभिनेते प्रसाद ओक आणि सिने अभिनेत्री अमृता खानविलकर करणार आहेत.
Check Also
उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!
पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …
RamPrahar – The Panvel Daily Paper