Breaking News

आफ्रिदीचे ते शतक साकारले सचिनच्या बॅटने

इस्लामाबाद : वृत्तसंस्था

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने त्याच्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रात बरेच गौप्यस्फोट केले आहेत. केनिया येथे झालेल्या तिरंगी मालिकेतून आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचा हा पदार्पणाचा सामना संस्मरणीय ठरला होता. त्याने 37 चेंडूंत सर्वात जलद शतक ठोकले, पण आफ्रिदीनं झळकावलेले ते जलद शतक हे महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या बॅटीतून साकारले होते.

आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात याबाबतचा खुलासा केला. सचिन तेंडुलकरने प्रतिकृती तयार करण्यासाठी त्याची बॅट पाकिस्तानचा माजी खेळाडू वकार युनिसकडे दिली होती. वकार ती बॅट सिआलकोट येथील क्रीडा साहित्याचे उत्पादन करणार्‍या कंपनीला देणार होता, मात्र ती बॅट सिआलकोट येथे पोहोचण्यापूर्वी आफ्रिदीच्या हातात पोहोचली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply