Breaking News

पनवेलमध्ये शेकापला धक्का!

दुंदरे येथील उसाटकर कुटुंबियांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. दुंदरे येथील गुरूनाथ रामदास उसाटकर, बारक्या नामदेव उसाटकर, विनायक रामदास उसाटकर, आशीर्वाद गुरूनाथ उसाटकर तसेच सिद्धेश तुळशीराम उसाटकर यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत करत संघटन वाढीसाठी आणि विकासाच्या राजकारणासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी नगरसेविका नीता माळी, माजी सरपंच रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य शांताराम चौधरी, नाना पाटील, संदीप पाटील, राजेश चौधरी, संतोष चौधरी, कृष्णा सिनारे, रूपेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
एकेकाळी पनवेल तालुक्यात भक्कम संघटन असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने काँग्रेस व शिवसेना (महाविकास आघाडी) यांच्यासोबत आघाडी केल्याने पक्षाची स्वतंत्र ओळख धूसर झाली आहे. शेकापला स्वतःच्या ताकदीवर राजकारण करण्याऐवजी इतर पक्षांच्या कुबड्यांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व अस्वस्थता वाढली आहे. याच कारणामुळे शेकापला सातत्याने गळतीचा सामना करावा लागत आहे. दुंदरे येथील उसाटकर कुटुंबियांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शेकापला दणका बसला आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply