Breaking News

भाजप महायुतीच्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीने प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून विकासाच्या मुद्द्यावर आधारित प्रचारामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 1) आयोजित करण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीला मतदार नागरिकांनी उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद दिला. या वेळी विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप महायुतीने विकासकामांचा आढावा घेत जनतेसमोर आपली भूमिका प्रभावीपणे मांडली आहे. महायुतीने आतापर्यंत राबविलेल्या विविध विकासकामांमुळे सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यात युती नेहमीच अग्रेसर राहिली आहे. याचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या जीवनमानावर झाला आहे. केंद्रात व राज्यात भाजप महायुतीचे ‘डबल इंजिन सरकार’ कार्यरत आहे. केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वय राहिल्यास विकासकामांना अधिक गती मिळते आणि निधीच्या उपलब्धतेतही अडचणी येत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करायचा असल्यास जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्येही भाजप महायुतीची सत्ता असणे अत्यंत गरजेचे आहे.
पळस्पे व कोन येथून या बाईक रॅलीला सुरुवात झाली. तालुक्यातील विविध भागात झालेल्या या रॅलीदरम्यान भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. रॅलीच्या माध्यमातून विकासाचा संदेश घराघरात पोहचविण्यात आला असून मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून महायुतीला आपला पाठिंबा दर्शविला.
पनवेल तालुक्यात भाजप महायुतीच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असून सुज्ञ मतदार नागरिकांचा कौल विकासाच्या बाजूने म्हणजेच भाजप महायुतीकडे झुकत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply