Breaking News

विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली -लोकनेते रामशेठ ठाकूर

भाजप महायुतीच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरून विरोधकांकडून अपप्रचार -माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचाराचा धडाका लावला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गव्हाण जिल्हा परिषद गटातील उमेदवार निकिता खारकर आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवार जिज्ञासा कोळी यांचा गव्हाण, कोपर, न्हावे व परिसरात जोरदार प्रचार केला.
या प्रचारादरम्यान बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, भाजपने गेल्या काही वर्षांत केलेल्या भरीव विकासकामांमुळे या संपूर्ण परिसराचा कायापालट झाला आहे. आमची कामगिरी जनतेसमोर आरशासारखी स्पष्ट आहे. त्यामुळेच येणार्‍या निवडणुकीत विरोधकांचा पराभव अटळ असल्याचे चित्र दिसत असून याच भीतीपोटी विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. विरोधक बेताल व खोटा प्रचार तसेच दिशाभूल करण्याचे उद्योग करत आहेत, मात्र जनता आता जागरूक असून सत्य ओळखते.
या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांनीही विरोधकांवर जोरदार टीका करत सांगितले की, गव्हाण जिल्हा परिषद गट हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ असल्याने भाजप व महायुतीच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरून विरोधकांकडून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे, मात्र या अपप्रचाराला जनता येत्या निवडणुकीत मतांच्या जोरावर चोख उत्तर देईल.
या प्रचारात माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, रत्नप्रभा घरत, भाजप नेते चंद्रकांत भोईर, रविशेठ पाटील, हेमंत ठाकूर, सचिन घरत, जयवंत देशमुख, किरण देशमुख, विश्वनाथ कोळी, न्हावे सरपंच विजेंद्र पाटील, मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ, नगरसेविका दर्शना भोईर, प्रतिभा भोईर, अस्मिता घरत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, योगिता भगत, मीनाक्षी पाटील, सागर ठाकूर, सी.एल. ठाकूर, वंदना पाटील, किशोर पाटील, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, वर्षा नाईक, जयश्री कोळी, विराज देशमुख, बाळू कोळी, सुनील कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रचारादरम्यान परिसरातील नागरिकांकडून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांमध्ये मोठा आत्मविश्वास पहावयास मिळत आहे.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply