पनवेल ः रामप्रहर वृत्त
विरोधकांना जात, धर्म, भाषा, पंथ याच्या पलीकडे काहीच दिसत नाही, पण आमचे प्रेम हे येथील मातीशी आहे. आपल्याला उरणचा सर्वांगीण विकास करायचा आहे. सगळ्या समाजांच्या बंधू-भगिनींना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. राज्य आणि केंद्र शासनाकडून जे जे येथे करता येईल ते करण्याची कटीबद्धता आमची आहे, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी येथे केले.
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप महायुतीचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर उरणमधील मोरा येथे व्यापार्यांसोबत संवाद साधण्यासाठी बुधवारी (दि. 26) प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आमदार महेश बालदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल करीत त्यांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला.
या सभेस भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, शहराध्यक्ष कौशिक शाह, हस्तीमल मेहता, रोशन मेहता, हितेश शाह, मनन पटेल, मनोहर सहथिया, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा कोळी-शाह यांच्यासह नगरसेवकपदाचे उमेदवार, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात आमदार महेश बालदी म्हणाले की, स्वतःचे कर्तृत्व संपले की जात आठवते, पण विरोधकांनी कितीही ताकद लावली तरी उरणमध्ये भाजपने केलेल्या विकासकामांच्या जोरावर नगर परिषदेत सर्वच्या सर्व 21 उमेदवार बहुमताने विजयी होणार आहेत. जे केवळ व्हिडीओ काढून प्रचार करत आहेत ते 3 तारखेनंतर कुठेही दिसणार नाही.
नगरपालिका आमच्या वैभवाचे साधन नसून समाजसेवेची आलेली संधी आहे हे मानणारे भाजपचे उमेदवार आहेत. त्यामुळे या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी केेले.
Check Also
नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …
RamPrahar – The Panvel Daily Paper