पनवेल ः रामप्रहर वृत्त
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकारे पक्षाला खिंडार पडले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.
या वेळी ‘उबाठा’चे महेंद्र ठाकूर, मनिषा ठाकूर, मनिष ठाकूर, सुरेश तांडेल, प्राजक्ता तांडेल आणि मितेश ठाकूर यांनी पक्षाला रामराम ठोकत विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या पक्षप्रवेशामुळे गव्हाण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुतीची ताकद अधिक वाढली आहे.
पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, महायुतीच्या गव्हाण जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार निकिता खारकर, अरुणशेठ ठाकूर, सागर ठाकूर, सी.एल. ठाकूर, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, निलेश खारकर, राहुल घरत, अरुण घरत, नरेश मोकल, मदन ठाकूर, सुरेश ठाकूर आदी उपस्थित होते.
Check Also
लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली
पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …
RamPrahar – The Panvel Daily Paper