मुंबई : प्रतिनिधी
आयपीएलच्या 14व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी आता दोन आठवड्यांहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 9 एप्रिलला सलामीचा सामना रंगणार आहे. मुंबईच्या संघात दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन गुरुवारी दाखल झाला.
यंदाच्या आयपीएलसाठी झालेल्या लिलावात अर्जुन तेंडुलकरचे नाट्यमयरित्या अगदी शेवटी नाव आले आणि मुंबई इंडियन्सने या एकमेव फ्रँचायझीने त्याच्यावर बोली लावली. 20 लाखांच्या मूळ किमतीत तो मुंबई इंडियन्सचा सदस्य झाला. मुश्ताक अली चषक ट्वेण्टी-20 स्पर्धेतून मुंबईच्या सीनिअर संघात पदार्पण करीत अर्जुनने स्वतःसाठी आयपीएलचे दार उघडले.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper