Breaking News

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा संघ जाहीर

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने 18 ते 22 मार्चदरम्यान पुणे वाघोली येथे आयोजित 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचा संघ जाहीर करण्यात आला आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंना आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 15) शुभेच्छा दिल्या.
रायगडच्या संघासाठी प्रशिक्षकपदी रोहिदास पाटील आणि व्यवस्थापक म्हणून दिलीप पाटील यांची निवड करण्यात आली. हा संघ रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे आधारस्तंभ आमदार प्रशांत ठाकूर आणि असोसिएशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या मंगळवारी (दि. 17) स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.
या खेळाडूंना पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे सचिव पैलवान रूपेश पावशे, सहसचिव निलेश म्हात्रे, खजिनदार राजेश भोईर, राजाराम कुंभार आदी उपस्थित होते.

Check Also

प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण वर्गाचा समारोप

पनवेल : रामप्रहर वृत्तप्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण हे केवळ शस्त्र चालवण्याचे नसून ते स्वतःबद्दलचा स्वाभिमान …

Leave a Reply