Breaking News

सामाजिक कार्यकर्ते गुलशन पाटील यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष नेहमीच सर्वसामान्य आणि गोरगरिबांचा आवाज बुलंद करण्याचे काम करते तसेच त्यांच्यासाठी अनेक योजना प्रभावीपणे राबवते. याच कार्यपद्धतीमुळे जनतेचा भाजपवर मोठा विश्वास असून तो सार्थ ठरवणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी केले.
पनवेल तालुक्यातील वावंजे येथील सामाजिक कार्यकर्ते गुलशन पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यलयात हा कार्यक्रम झाला. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवणे आणि कोणत्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणे ही भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, नगरसेवक दिनेश खानावकर, किरण दाभणे, महेश पाटील, प्रकाश खैरे, दशरथ पाटील, वासुदेव चोरमेकर, वसंत पाटील, सागर सांगडे, भरत पाटील, महेश पाटील, शशिकांत गोंधळी, चंद्रकांत पाटील, विलास खैरे, अरुण थळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते गुलशन पाटील यांच्यासह कृष्णा पाटील, सतीश पाटील, रूपेश पाटील, नितीन भोईर, अनिल मुकादम, मयूर म्हात्रे, भानूदास वलपकर, सोमनाथ वलपकर, प्रवीण गोंधळी, प्रसाद सांगडे, प्रेम मुकादम, संजय सांगडे, करण पाटील, संदेश मढवी आदींनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. आमदार प्रशांत ठाकूर व इतर मान्यवरांनी यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा संघ जाहीर

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने 18 …

Leave a Reply