Breaking News

स्वछंद सामाजिक विकास संस्थेतर्फे विविध उपक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
आपण जेव्हा दुसऱ्यासाठी काम करतो, तेव्हाच आपल्या जीवनात खरा आनंद निर्माण होतो. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात आणि त्यांना आनंद देण्यातच मानवी जीवनाचे खरे समाधान सामावलेले आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे स्वछंद सामाजिक विकास संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केले.
स्वछंद सामाजिक विकास संस्थेच्या वतीने रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून नवीन पनवेल येथील हनुमान मंदिरात गुरुवारी चैत्र हळदी-कुंकू समारंभ, सामूहिक रामरक्षा आणि मारुती स्तोत्र पठणाचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे स्वागत करत संस्थेच्या वतीने अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना त्यांनी संस्थेने आपले हे सेवाव्रत भविष्यातही असेच अविरत सुरू ठेवावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्वछंद सामाजिक विकास संस्थेच्या नवीन लोगोचे अनावरण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्याच हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेने एक स्तुत्य उपक्रम जाहीर केला असून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत संस्कार भारती रांगोळी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. संस्थेच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल आणि उपक्रमाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समाधान व्यक्त करत संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शकुंतला ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला नगरसेवक ॲड. मनोज भुजबळ, अजय बहिरा, नगरसेविका डॉ. प्रियांका कांडपिळे, डॉ. अस्मिता घरत, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका सुशीला घरत, सुहासिनी शिवणेकर, गुलाब थवई, कृपेश कांडपिळे, स्वराली कांडपिळे, मंदिर कमिटी अध्यक्ष रवींद्र कांडपिळे, खजिनदार उमेश मोरे, कमिटी उपाध्यक्ष अनिल लोंढे, स्वच्छंद सामाजिक विकास संस्था सहकारी कमिटीच्या अध्यक्ष नीता घाटुगडे, सचिव सुलभा मोरे, कार्याध्यक्ष संध्या भुजबळ, माया देसाई, अंकिता पारकर यांच्यासह पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

आमदार महेश बालदी यांच्या मुद्द्यांवर सरकार गंभीर

सिडको अधिकाऱ्यांवर कारवाई होणार -मंत्री गोगावले पनवेल : रामप्रहर वृत्तसिडको महामंडळाच्या कारभारातील अनियमितता, भ्रष्टाचार आणि …

Leave a Reply