Breaking News

खोपोलीत भाजपचा जल्लोष

खोपोली : प्रतिनिधी

खासदार नारायण राणे आणि खासदार कपिल पाटील यांचा बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळात शपथविधी झाला, त्याचा आनंद खोपोली भाजपतर्फे साजरा करण्यात आला. या वेळी फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटप करून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.  खोपोली नगर परिषदेतील गटनेते तुकाराम  साबळे तसेच भाजपचे शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, उपाध्यक्ष प्रमोद पिंगळे, सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, दिलीप पवार, वामनराव दिघे, कामगार मोर्चाचे जिल्हा सहसंयोजक सूर्यकांत देशमुख, सहकार सेलचे जिल्हा सदस्य दिलीप निंबाळकर, महिला मोर्चाच्या जिल्हा कार्यकारीणी सदस्य स्नेहल सावंत, खोपोली शहर अध्यक्षा शोभा काटे, युवा मोर्चाचे अजय इंदुलकर, खोपोली चिटणीस सुमिता महर्षि, महिला मोर्चा चिटणीस रेखा शिंदे, ध्रुव मेहेंदळे,  विमल गुप्ते, श्याम करणसिंग, हिम्मतराव मोरे, सागर काटे यांच्यासह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply