पनवेल : रामप्रहर वृत्त
सोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टीआयपीएल सिझन ३ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि.११) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा पनवेल शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानावर खेळली जात आहे.
उद्घाटन समारंभाला महापौर नितीन पाटील, भाजप पनवेल शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सुमित झुंजारराव, गणेश कडू, शशिकांत शेळके, महादेव मधे, नगरसेविका प्रीती जॉर्ज, उद्योजक राजू गुप्ते , भाजप नेते बबन बारगजे, महेश मोहिते, स्वप्नील ठाकूर, प्रवीण मोहोकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेत १६ संघांमध्ये सामने रंगणार असून विजेत्या संघांसाठी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पर्धेत सहभागी सर्व संघांना आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
Check Also
गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत सीकेटी विद्यालयाचे यश
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल …
RamPrahar – The Panvel Daily Paper