Breaking News

23 जूनला आवरे, गोवठणे ग्रा. पं.च्या निवडणुका

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील जुलै ते सप्टेंबर 2019 मध्ये मुदत संपणार्‍या, तसेच नव्याने स्थापित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता थेट सरपंच व सदस्य पदांच्या निवडणुका घेण्यात येणार असून, तालुक्यातील आवरे व गोवठणे या दोन ग्रामपंचायतीचे बिगुल वाजले असून, 31 मे 2019 ते 6 जून 2019  सकाळी 11:00 ते दुपारी 3:00 पर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

7 जून 2019 रोजी 11:00 वाजता नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे, तर नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख 10 जून 2019 दुपारी 3:00 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे, तसेच नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर दुपारी 3:00 नंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात येणार असून, अंतिमरीत्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

23 जून 2019 रोजी आवरे व गोवठणे ग्रामपंचायतींचे मतदान घेण्यात येणार आहे, तर 24 जून 2019 रोजी सकाळी 10:00 वाजता उरण तहसील कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply