Breaking News

खांदा कॉलनीत सामाजिक संस्थांकडून स्वच्छता अभियान

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त  : येथे रविवारी (दि. 26) खांदेश्वर मंदिराच्या परिसरात, तसेच खांदेश्वर तलाव स्वच्छता अभियान राबविण्यात आले. खांदा कॉलनीमधील सामाजिक संस्था अलर्ट सिटीझन फोरम, मॉर्निंग योगा ग्रुप, आणि संजय भोपी सोशल क्लब यांनी सहभाग घेतला, तसेच महापालिकेचे सफाई कामगार यांनीसुद्धा मंदिर स्वच्छता अभियानात भाग घेतला. मंदिर व तलावाच्या आजूबाजूचा  परिसर स्वच्छ करण्यात आला, तसेच हे अभियान नगरपालिका कर्मचारी ह्यापुढे पावसाळ्यापर्यंत सुरू ठेवणार असल्याची ग्वाही नगरसेवक व प्रभाग समिती अध्यक्ष संजय भोपी यांनी दिली.

या वेळी महावितरणचेचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, पनवेल महानगरपालिका नगरसेवक व  प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी, आनंद पाटील, संजय पाटील, तसेच लक्ष्मण साळुंखे, संजय वैद्य, सुनील श्रीखंडे, भीमराव पोवार, विनय पाटील,  विनीत गुरमे, रामदास गोवारी, विश्राम एकंबे, दत्ता कुलकर्णी, सुरेश म्हात्रे, दशरथ म्हात्रे, सचिन मोरे, विठोबा बनसोडे, तानाजी करवीर, रमाकांत भगत, घरत सर, पाटील गुरुजी, पोपटराव कदम, मीलन भुजबळ, अभिषेक भोपी, प्रेमा भोपी, रत्नाकर वाघ आणि इतर तीन्ही ग्रुपचे बरेच सदस्य यांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम पार पाडली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply