उलवे नोड ः रामप्रहर वृत्त
गुरुस्मृती फोर्टी प्लस (४०+) शिवाजीनगर यांच्या वतीने पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे करण्यात आले आहे. या माजी खासदार चषक २०२६ स्पर्धेचे शनिवारी (दि.१६) नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला असून पहिल्याच दिवशी खेळाडूंचा मोठा उत्साह पहायला मिळाला. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजपचे शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, उपाध्यक्ष व्ही.के. ठाकूर, पनवेल पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, आर.सी. ठाकूर, अमर कडू, राकेश कडू, व्ही.के. ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरली ती खेळाडूंना मिळालेली विशेष भेट. परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व १६ संघांतील १२ खेळाडूंना ब्रँडेड स्पोर्ट्स शूजचे मोफत वाटप करण्यात आले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या या खास भेटीमुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण असून आयोजकांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या क्रिकेट सामन्यांचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी पार पडणार आहे.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper