नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवीन मुंबईतील यू बिझनेस मीटच्या वतीने नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट २०२६चे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि थायलंड यांच्यादरम्यान व्यापार उद्योजकता वृद्धिंगत व्हावी यासाठी बेलापूरच्या दि पार्क हॉटेलमध्ये झालेल्या बिझनेस समिटला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांना तसेच थायलंड येथून आलेले पिएटा सदस्य तथा माजी राजदूत थाराडोल थाँगग्रंग आणि पिटा सदस्य नरेन पियासच्चादेश यांनाही शुभेच्छा दिल्या.
या समिटमध्ये विविध व्यवसायिकांच्या पॅनल डिस्कशनसाठी मॉडरेटर म्हणून काम पाहणारे प्रसिद्ध पत्रकार महेश म्हात्रे आणि टाइम्स ऑफ इंडियाचे असिस्टंट एडिटर चित्तरंजन टेंभेकर यांचेदेखील आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन केले. यू बिझनेस मिटचे फाउंडर वैभव सोनटक्के आणि को-फाउंडर रवींद्र प्रताप गुप्ता, पत्रकार मंदार दोंदे, पत्रकार विवेक पाटील, समृद्धी वाणी यांच्या संकल्पनेतून समिटचे आयोजन करण्यात आले होते.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper