Breaking News

ब्राझीलच्या फुटबॉल कर्णधारपदी एल्वेस

रिओ जानेरिओ : वृत्तसंस्था

ब्राझीलने कोपा अमेरिका कप स्पर्धेसाठी स्टार फुटबॉलपटू नेमारच्या स्थानी दानी एल्वेसची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. ब्राझील फुटबॉल महासंघाने (सीबीएफ) सोमवारी ही घोषणा केली.सीबीएफने म्हटले की, ‘प्रशिक्षक टीटे यांनी या निर्णयाबाबत नेमारला सूचना दिलेली आहे.’ आठ वेळा जेतेपदाचा मान मिळवणार्‍या ब्राझील संघाला 14 जूनपासून प्रारंभ होत असलेल्या स्पर्धेत बोलविया, वेनेझुला व पेरू यांच्यासह एका गटात स्थान मिळाले आहे. ब्राझील संघ त्याआधी, कतार व होंडुरास या संघाविरुद्ध सराव सामने खेळेल.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply