सवणेत शेकापला खिंडार

उरणः प्रतिनिधी

पनवेल आणि उरण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सवणे गावातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केल्याने शेकापला मोठे खिंडार पडले आहे. या प्रवेशकर्त्यांचे  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख उपस्थित होते. हा पक्ष प्रवेश सोहोळा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवास्थानी शनिवारी संपन्न झाला. शेतकरी कामगार पक्षाला चावणे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे खिंडार पडले आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील सवणे येथील धनाजीराव देशमुख, शरद देशमुख, हरीश्चंद्र देशमुख, निखील देशमुख, सचिन देशमुख, संजय देशमुख, सुहास साठे, विशाल देशमुख, राजेंद्र देशमुख, परशुराम हिरवे, राकेश हिरवे, कविता हिरवे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहिर प्रवेश केला आहे.

यावेळी चावणे विभागीय अध्यक्ष किरण माळी, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, भाजपचे गुळसुंदे विभागीय अध्यक्ष प्रविण खंडागळे, मारुती पाटील, शंकर देशमुख, कराडे खुर्दचे माजी सरपंच विजय मुंडकर, माजी उपसरपंच रविंद्र चितळे, संदीप पाटील, सचिन पाटील, भगवान देशमुख,  तानाजी निरगुडा, देविदास पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply