Breaking News

मंत्रिमंडळाचा आज विस्तार!

मुंबईः प्रतिनिधी

रविवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केली. गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा होती. अखेर मुहूर्त सापडला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. तर आरपीआयतर्फे अविनाश महातेकर शपथ घेणार आहेत, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शपथविधी सोहळा राजभवन येथील गार्डनवर पार पडणार आहे.

मंत्रिमंडळात सात जागा रिक्त आहेत. या जागांवर कोणत्या नेत्यांची वर्णी लागते ते पहाणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील आठवड्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply